युवराज पुन्हा एकदा दिसणार निळ्या जर्सीमध्ये

0
777

नवी दिल्ली, दि, २१ (पीसीबी) – अष्टपैलू युवराज सिंह परदेशी टी २० क्रिकेट लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू असणार आहे. त्याला गुरूवारी कॅनडा टी २० लीगमध्ये टोरंटो नॅशनल्स संघाने विदेशी खेळाडू म्हणून करारबद्ध केले आहे. न्यूझीलंडचा मॅक्यूलम आणि विंडीजचा कायरन पोलार्डही टोरंटो नॅशनल्स संघाचे सदस्य असणार आहेत.

कॅनडामधील ही लीग स्पर्धा २५ जूलै रोजी सुरू होणार आहे. यामध्ये पाच संघाचा सहभाग आहे. ११ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या युवराजने विदेशी टी २० क्रिकेट लीगमघ्ये खेळण्याच्या परवानगीचे पत्र बीसीसीआयला लिहीले आहे. निवृत्ती स्वीकारल्यामुळे त्याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.