जम्मू काश्मीर: चार दहशतवाद्यांना कंठस्नान, २१ मोस्ट वाँटेड दहशतवादी हिटलिस्टवर

0
1072

श्रीनगर, दि. २३ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलांनी आयसिसच्या जम्मू-काश्मीरमधील म्होरक्यासह चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यापाल राजवट लागू झाल्यावरची ही पहिलीच मोठी चकमक होती. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली असून आगामी काळात लष्करी कारवाया वाढण्याची चिन्हे आहेत.

सुरक्षा दलांनी जम्मू- काश्मीरमधील टॉप २१ दहशतवाद्यांची यादीच तयार केली असून आगामी काळात या दहशतवाद्यांना टार्गेट केले जाणार आहे. यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचे ११, लष्कर – ए- तोयबाचे सात, जैश- ए- मोहम्मदचे दोन आणि अल-कायदाची जम्मूतील संघटना अन्सार गजवत उल हिंद या संघटनेच्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे. या २१ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना ए++ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या दहशतवाद्यांवर १२ लाखांचे इनाम आहे.