सोलापूरात जमीन विक्रीप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी खासदार, आमदारांवर गुन्हा

0
967

पंढरपूर, दि.२३ (पीसीबी) – सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर माढा पोलीस ठाण्याता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी माढा न्यायालयात केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार माजी खासदार संदिपान थोरात, आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्यार कलम ४०९, ४२०, ४६४, ४६५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.