जम्मू-काश्मीरमध्ये २ पाक घुसखोरांना कंठस्नान; ३ जवान शहीद

0
440

श्रीनगर, दि. २१ (पीसीबी) – भारतीय सीमेवर पुन्हा एकवार पाकिस्तानकडून झालेला घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. आज (रविवारी) दुपारच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील सुंदरबनी क्षेत्रात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सैन्याने ठार केले. मात्र या कारवाईत तीन भारतीय जवानांना वीरमरण आले, तर एक जवान जखमी आहे.

रविवारी सकाळी कुलगाममध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ही चकमक संपल्यावर झालेल्या एका स्फोटात तीन नागरिक मृत्युमुखी पडले. त्यानंतर दुपारी सुंदरबनी क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. लष्कराने चोख प्रत्युत्तर देत घुसखोरी करणाऱ्या दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घातले. यापैकी एकाकडून एके ४७ रायफल जप्त करण्यात आली.