अखेर रणवीर सिंग-दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला मुहूर्त मिळाला

0
597

मुंबई, दि. २१ (पीसीबी) अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. येत्या १४ आणि १५ नोव्हेंबरला हा विवाहसोहळा होणार असल्याची माहिती रणवीरने ट्विटरवर दिली आहे.

‘तुम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, कुटुंबीयांच्या आशीर्वादाने १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी आमचे लग्न होत आहे. इतक्या वर्षांत तुम्ही आम्हाला जे प्रेम दिले, त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या आधारावर आमचा जो पुढील प्रवास सुरू होणार आहे. त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. दीपिका आणि रणवीर,’ अशी पोस्ट रणवीरने ट्विटरवर लिहिली आहे.

रणवीर आणि दीपिका या दोघांनीही सोशल मीडियावर लग्नाच्या तारखेची घोषणा केली आहे.  लग्नाची तारीख ठरवण्यासाठीच रणवीर आणि दीपिकाने सर्वाधिक वेळ घेतला. आपल्या लग्नात सर्व गोष्टींचे नियोजन अगदी सुरेख पद्धतीने व्हावे, असाच त्यांचा आग्रह आहे. डेस्टिनेशन वेडिंगच्या थाटात हा विवाहसोहळा पार पडणार असून  बंगळुरु आणि मुंबईत त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने जंगी पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.