जगद्‌गुरु महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

0
676

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – जगद्‌गुरु महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील  यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

आज (रविवार)  सकाळी महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

त्यानंतर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे झालेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे झालेल्या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, डॉ.मारुती गायकवाड, डॉ. अनिकेत लाठी आदी उपस्थित होते.