छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही मशिद कधी तोडली नाही, तेच आमचे रोलमॉडेल – नितीन गडकरी

0
850

नागपूर,दि.२२(पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच एकही मशिद तोडली नाही. तेच आमचे रोड मॉडेल आहेत, तेच आमचे आदर्श आहेत, असं भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुस्लिमांवर अन्याय होणार नसल्याचंही म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याणचा किल्ला जिंकला, तेव्हा कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेला महाराजांसमोर नेण्यात आलं. त्यावेळी महाराजांनी सुभेदाराच्या सुनेला सन्मानपूर्वक वागणूक दिली होती. त्यांना शिवाजी महाराज यांनी साडी भेट दिली,ओटी भरली. माझी आई एवढी सुंदर असती तर मी पण असाच सुंदर दिसत असतो. या शब्दांत महाराजांनी त्या महिलेचा गौरव केला होता, असं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं आहे.

महाराजांनी कधीही मुसलमान बांधवांवर अन्याय केला नाही. तेच आमचे रोलमॉडेल आहेत. ते आमचे आदर्श आहेत, असंही गडकरींनी यावेळी सांगितलं आहे. गडकरींनी यावेळी बोलताना काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. जेव्हा एखादी गोष्ट पटवून देता येत नाही तेव्हा गोंधळ निर्माण केला जातो. हेच सध्या सुरू आहे. व्होट बँक पॉलिटिक्ससाठी काही पक्षांचे एकच भांडवल आहे, असं म्हणत गडकरींनी नाव न घेता काँग्रेसवर टीका केली आहे.