माझा पुतळा जाळायचा असेल तर तो देखील जाळा, परंतु देशाची संपत्ती जाळू नका – नरेंद्र मोदी

0
505

नवी दिल्ली,दि.२२(पीसीबी) – माझा पुतळा जाळा पण संपत्तीचं नुकसान नको, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. ते दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘धन्यवाद रॅली’त बोलत होते. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीकरांना आता खोटी आश्वासनं मिळणार नाहीत, असंही नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं आहे.

मोदींना देशाच्या जनतेने निवडले हे जर तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही मोदींना नाव ठेवा, मोदींचा तिरस्कार करा. मोदीचा जेवढा विरोध करायचा तेवढा नक्की करा, जेवढा राग काढायचा तेवढा काढा, एवढच नाहीतर मोदीचा पुतळा जाळायचा असेल तर तो देखील जाळा, परंतु देशाची संपत्ती जाळू नका.” असे म्हणत गरिबाच्या झोपड्या, वाहनं जाळू नका. गरिबांना मारून तुम्हाला काय मिळणार? असा संतप्त सवाल पंतप्रधान मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधाच्या मुद्यावरून काँग्रेस, विरोधीपक्षांसह हिंसाचार करणाऱ्यांना उद्देशुन केला आहे.

दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्यांचा व हिंसाचार करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. दिल्लीतील १७३४ अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर भाजपाकडून रामलीला मैदानात ‘धन्यवाद’ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, याप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते.