चौकीदार चोर नव्हे, प्युअर; पुन्हा पीएम होणे शुअर; राजनाथ सिंहांची आठवले स्टाईल बॅटिंग

0
527

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – भाजपा आणि काँग्रेसमध्ये चौकीदारावरून चांगलीच जुंपली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चौकीदार चोर है अशी घोषणा वारंवार केली आहे. त्या टीकेला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युदर दिले. चौकीदार चोर नाही, तर प्युअर आहे, असे सिंह म्हणाले. भाजपाच्या विजय संकल्प रॅलीत भाषण करताना राजनाथ यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला.

‘चौकीदार चोर नहीं, चौकीदार प्युअर है. चौकीदार का दुबारा पीएम बनना शुअर है, दैश की समस्याओं का वह ही क्युअर है’, असे राजनाथ सिंह भाजपच्या रॅलीला संबोधित करताना म्हणाले. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरून राहुल गांधींनी मोदींवर टीका करताना चौकीदार चोर है, असा आरोप केला होता.  त्यानंतर चौकीदार चोर है अशी घोषणा देशभरात गाजली. मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात. मात्र ते स्वत:च चोर आहेत, असा खळबळजनक राहुल गांधींनी केला होता.