चैतन्य पार्कजवळील नाला बंदीस्त करण्याच्या कामाला सुरूवात; सीमा सावळे, सारंग कामतेकर, समर कामतेकर यांचा पाठपुरावा  

0
661

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – इंद्रायणीनगर, प्रभाग क्रमांक ८ मधील चैतन्य पार्कजवळील नाला सिमेंट पाईप टाकून बंदीस्त करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या कामी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनी  पाठपुरावा केला होता.

प्रभाग क्रमांक ८ मधील चैतन्य पार्कजवळील नाला उघडा होता. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. नाला उघडा असल्यामुळे येथे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता होती. तसेच पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना या परिसरात ये– जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

याची गंभीर दखल घेत   स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाला  सिमेंट पाईप टाकून नाला बंदिस्त करण्याच्या सुचना दिल्या होत्या.  तसेच या कामासाठी  लागणाऱ्या  आवश्यक निधीची तरतूद करून घेतली होती.  हा निधी मंजूर झाल्यानंतर  नाल्यामध्ये सिमेंट पाईप टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

या कामांसाठी भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनीही   महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू  केला होता.  नाल्यामध्ये सिमेंट पाईप टाकण्याच्या  कामाला  सुरूवात झाली आहे. यामुळे  परिसरातील  नागरिकांमधून समाधान  व्यक्त  केले जात आहे.