चिखली/कुदळवाडीत भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग; सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात

0
754

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमारास चिखली कुदळवाडी येथील एका भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली.

घटनेची माहिती मिळताच संत तुकारामनगर फायर स्टेशनच्या दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने एमआयडीसी, सेंच्युरंका, भोसरी, प्राधिकरण, चिखली आणि तळवडे येथील फायर स्टेशनच्या प्रत्येकी एक गाडी मागवण्यात आल्या यामध्ये तब्बल २० ते २५ जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते पण भंगाराच्या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि केमिकल असल्याने आग विझवण्यात मशागत करावी लागली. तब्बल सहा तासानंतर जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. या घटनेनंतर आजूबाजूचे दुकान आणि गोडाऊनला झळ बसली असून यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे.

आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन अधिकारी किरण गावडे, ऋषीकांत चिपाडी, अशोक रानडे, राजेंद्र गवळी, लक्ष्मण ओव्हाळे, अमोल चिपलुनकर, अजय कोकणे, शिवाजी चिडे आणि आऊट स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.