चिंचवड येथील सामाजिक संस्था व डॉ. लाल पॅथोलॉजीच्या आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
779

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – सामाजिक संस्था व डॉ. लाल पॅथोलॉजी यांच्या संयुक्त विद्यामाने   चिंचवडमधील केशवनगर परिसरातील सद्गुरू हॉल येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शुगर, कॉलेस्ट्रोल,ब्लड प्रेशर आदी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात सुमारे १५६ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.

यावेळी राज्यमंत्री लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, बिभीषण चौधरी, महावितरण सदस्य भारती विनोदे, मधुकर बच्चे, शारदा विद्या प्रसारक मंडळ संचालिका, प्राध्यापिका माधुरी गुरव यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुकुंद गुरव, पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष सौरभ शिंदे, प्रभाग अध्यक्ष गणेश बच्चे, अथर्व गुरव, गिरीश हंपे, महिला अध्यक्ष रोहिणी बच्चे, सौरभ कर्नावट, जुबेर शेख, आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कर्तव्य फाउंडेशन शारदा विद्या प्रसारक मंडळ, मधुकर बच्चे युवा मंचचैतन्य मेडिको आदी संस्था सहभागी होत्या.