चिंचवडमध्ये भुताची भीती दाखवून चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

0
637

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण काय केल्या थांबायचे नाव घेत नाहीए. बिजलीनगर चिंचवड येथे मंगळवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास एका नराधमाने चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले असून घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात ‘भागुचा काका’ नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपीने पीडित चार वर्षीय चिमुकलीला भुताची भिती दाखवून चिंचवड रेल्वे स्टेशन येथील निर्जनस्थळी घेऊन गेला. त्याने चिमुकलीला जबर मारहाण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन फरार झाला. रात्री चिमुकली घरी आल्यावर तिच्या पालकांनी तिला पाहिले तेव्हा ती खूप जखमी होती. घाबरलेल्या पालकांनी तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणी दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. यामुळे भेदरलेल्या अवस्थेत पीडितेच्या पालकांनी पोलीसांत तक्रार दाखल केली. पीडित चिमुकली प्रचंड घाबरलेली आहे. ती फक्त भागुच्या काकांनी असे केल्याचे बोलत आहे. पुढील उपचारासाठी तिला ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. चिंचवड पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. तर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.