१० वर्षांपूर्वी मी खूपच लहान होतो; नाना-तनुश्री वादावर शक्ती कपूर यांची विनोदी प्रतिक्रिया

0
927

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर हा वाद बॉलिवूडमध्ये चांगलाच पेटला आहे. नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीने गंभीर आरोप केल्यानंतर एकच खळबळ पुन्हा माजली आहे. बॉलिवूडमधले अनेक कलाकार तनुश्रीच्या बाजूने उभे राहिले आहेत. तर अमिताभ बच्चन, आमिर खान यांसारख्या कलाकाराने यावर मौन धारण करण्याचा पर्याय स्विकारला आहे.

या प्रकरणावर बॉलिवूडचा खलनायक शक्ती कपूर यांना प्रतिक्रिया विचारल्यानंतर विनोदनिर्मिती करत त्यांनी या प्रकरणावर बोलणे टाळले. ‘गेल्या काही दिवसांपासून मी अमेरिकेत होतो. मला तनुश्री- नानांमध्ये काय वाद आहे हेच माहित नाही’ अशी प्रतिक्रिया त्यांनी सुरूवातीला दिली. हे प्रकरण माध्यमांतील काही लोकांनी शक्ती कपूर यांना सविस्तर सांगितले. मात्र तनुश्री- नानांमधला वाद हा १० वर्षे जुना आहे असे कळल्यानंतर ‘१० वर्षांपूर्वी तर मी खूपच लहान होतो’ अशी विनोदी प्रतिक्रिया देत शक्ती कपूर यांनी नाना- तनुश्रीच्या वादावर बोलणे टाळले.