चाकण येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएममशीन फोडून चोरट्यांनी पळवली पावनेसोळा लाखांची रोकड

0
499

चाकण, दि. ३१ (पीसीबी) – गॅस कटरच्या सहाय्याने चाकण येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएममशीन कापून त्यातील १५ लाख ९४ हजार १०० रुपयांची रोख अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. तसेच एटीएम मशीनचे तब्बल ३ लाखांचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि.३०) रात्री उशीरा दिड ते पावनेचारच्या दरम्यान चाकण, खालुंब्रे येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम सेंटरवर घडली.  

याप्रकरणी सचिन शिवकरण काळगे (वय ३१, रा. फ्लॅट क्र.६, श्रीहरी बिल्डिंग, बापुजी बुवानगर, थेरगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण खालुंब्रे येथे बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम सेंटर आहे. शनिवारी रात्री उशीरा दिड ते पावनेचारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या एटीएम सेंटरमध्ये घुसून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापले. तसेच त्यातील १५ लाख ९४ हजार १०० रुपयांची रोख चोरुन नेली. आणि एटीएम मशीनचे ३ लाखांचे नुकसान केले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कठोरे अधिक तपास करत आहेत.