एकच राजे, बाबा राजे; नरेंद्र पाटलांनी घेतली शिवेंद्रराजेंची गळाभेट

0
865

सातारा, दि. ३१ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात भाजपने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने शिवेंद्रराजेंची गळाभेट घेतली.  तसेच त्यांनी चक्क एकच राजे, बाबा राजे अशा जोरदार घोषणाही दिल्या. यामुळे साताऱ्यात चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना – भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करत लोकसभेचा अर्ज दाखल केला. या घोषणाबाजीनंतर शिवेंद्रराजे समर्थकांनीही मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

काही दिवसांपूर्वी साताऱ्यात येऊन नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांच्या बरोबर एकत्र मिसळ खात, उदयनराजेंना मिसळीच्या तरीचा झटका दिला होता. त्यानंतर आता नरेंद्र पाटलांनी वाढदिवसानिमित्त शिवेंद्रराजेंची गळाभेट घेत घोषणाही दिल्या.  त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वेगळी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.