चाकणमध्ये घराचा दरवाजा उचकटून लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

0
830

चाकण, दि. १२ (पीसीबी) – बंद घराचा दरवाजा उचकटून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दि.८) चाकण नामदेवनगर येथील सोहम पॅराडाईज या घरात घडली.

याप्रकरणी घरमालक अशोक पोपट गोरे (वय ३१, रा. सोहम पॅराडाईज, नामदेवनगर, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आठच्या सुमारास फिर्यादी गोरे हे त्यांच्या घराला कुलुप लावून कामाला गेले होते. यादरम्यान त्यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश केला. आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही आणि महत्वाची कागदपत्रे असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गोरे दुपारी दोनच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.