चंद्रभागा नदीत मानवी विष्ठेचे सर्वाधिक विषाणू

0
417

पंढरपूर, दि. २ (पीसीबी) – पंढरपुरातून वाहणारी चंद्रभागा नदी सर्वात जास्त प्रदूषित झाली  आहे. या नदीमध्ये मानवी विष्ठेचे सर्वाधिक विषाणू असल्याचे धक्कादायक माहिती ‘क्षमा मी चंद्रभागा’ या परिषदेत अभ्यासकांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी चंद्रभागा प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली होती. मात्र, निधी येऊनही कोणतेही काम झालेले नाही. तसेच   प्राधिकरणालाही विशेष अधिकार नसल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. १) राज्यातील जल अभ्यासकांनी ‘क्षमा मी चंद्रभागा’ परिषदेचे आयोजन केले होते.

यावेळी नदी खोरे जलतज्ज्ञ डॉ. विजय परांजपे, अॅड. असीम सरोदे, भीमा नदी नीरु रक्षा रायतू वर्ग समितीचे अध्यक्ष पंचप्पा कलबुर्गी, शामसुंदर सोन्नर, जलतज्ज्ञ अनिल पाटील आदी उपस्थित होते.

भीमा नदीच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे प्रमाण अनेक ठिकाणी शून्यावर आहे.  मानवी विष्ठेतील विषाणूंची संख्या प्रतिलिटर २ ते ५ हजार इतकी आहे. या नदीचे पाणी आजही लाखो भाविक पितात. लाखो वारकरी पवित्र तीर्थ म्हणून प्राशन करतात. पाण्यात मानवी विष्ठेतील सर्वात जास्त विषाणू असल्याची धक्कादायक माहिती या परिषदेत देण्यात आली.