वारजे पुलाजवळ पीएमपीबस ओढ्यात कोसळली; १० प्रवासी जखमी

0
594

पुणे, दि. २ (पीसीबी) – चालकाचे नियंत्रण सुटल्याने पीएमपीएमएल बस ओढ्यात कोसळून अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात बसमधील १० प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्यातील वारजे पुलाजवळ हा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने कोणहीती जीवीत हानी झालेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीएमपीएमएल बस कात्रजहून निगडीच्या दिेशेने जात होती.  यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस ओढ्यात कोसळली. अपघातात बसमधील १० प्रवासी जखमी झाले.  त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसला क्रेनने ओढ्यातून बाहेर काढण्याचे काम चालू आहे.

सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीसदेखील घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. वाहतूक पुन्हा पुर्ववत करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरु आहे. पोलिस तपास करत आहेत.