चंद्रकांत पाटलांची विरोध उमेदवार किशोर शिंदेंना मतदान केंद्रावरच ऑफर  

0
1010

पुणे, दि. २१ (पीसीबी) –  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडमधील उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विरोधी उमेदवार मनसेचे किशोर शिंदे यांना मतदान केंद्रांवरच भाजप प्रवेशाची ऑफर दिली. मात्र, किशोर शिंदे यांनी हसतच पाटील यांची ऑफर नाकारून लावली. या ऑफरची चर्चा शहरात दिवसभर रंगली होती.  

चंद्रकांत पाटील यांनी  कोथरुड मतदारसंघामधील मयुर कॉलनीतील जोग शाळेतील मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी तिथे  उपस्थित असलेले  किशोर शिंदे  यांच्याशी पाटील यांनी मनमोकळा संवाद साधला.  यावेळी पाटील यांनी शिेंदे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.  मात्र, शिंदे यांनी त्यांना नकार दिला.

दरम्यान, किशोर शिेंदे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी  या विरोधी पक्षांचाही पाठींबा मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे वजन वाढले आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे स्थानिक नसल्याने त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे  कोथरुडच्या मतदारांनी स्थानिक उमेदवाराच्या पारड्यात किती मते टाकली, हे पाहण्यासाठी गुरूवारची (दि.२४) वाट पाहवी लागणार आहे.