किरकोळ भांडणाचा राग जीवावर बेतला असता; तरुणावर कोयत्याने वार

0
576

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. १४) सकाळी पावणे आठ वाजता टेल्को गेटसमोर, गावडे कॉलनी, चिंचवड येथे घडली.

सुरज सुनील शेळके (वय २३, रा. वेताळनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद आली आहे. पोलिसांनी सोन्या उर्फ आशुतोष वराडे (रा. भोई आळी, चिंचवड), प्रथमेश हिरेमठ आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात दोन वर्षांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडणे झाली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यातूनच आरोपींनी सोमवारी सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी सुरज शेळके यांच्यावर पाठीवर कोयत्याने वार केले. त्यात शेळके जखमी झाले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.