गुजरातमध्ये भाजच्या ज्येष्ठ नेत्याचा गोळ्या घालून खून

0
811

गुजरात, दि. ८ (पीसीबी) – अहमदाबाद येथील भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार जयंतीलाल भानुशाली यांचा धावत्या ट्रेनमध्ये अज्ञातांनी गोळ्या घालून खून केला. ही घटना सोमवारी (दि.७) रात्री उशीरा घडली.

रेल्वे पोलिस दलाने दिलेल्या माहतीनुसार, जयंतीलाल सोमवारी रात्री उशीरा ट्रेन क्रमांक १९११६ सयाजी नगरी एक्सप्रेसमधून अहमदाबादच्या दिशेने जात होते. या दरम्यान त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. एक गोळी त्यांच्या छातीत, तर दुसरी गोळी डोळ्यात लागली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा खून कोणी आणि का केला याबाबत पोलीस तपास करत आहेत.