किकबॉक्सिंग स्पर्धेत दिव्या वर्पेला सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक 

0
624

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – छत्तीसगड येथे झालेल्या ६४ व्या राष्ट्रीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सांघिक विजेतेपद मिळवले. तर पिंपरी-चिंचवड संघाची महिला किकबॉक्सर दिव्या विकास वर्पे हिने १९ वर्षाखालील ४८ किलो वजनी गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सलग तिसऱ्या वर्षी सुवर्ण पदक पटकावले.

दिव्याने पहिल्या फेरीत पश्चिम बंगालच्या खेळाडूस १५-७ च्या फरकाने पराभूत केले. दुसऱ्या फेरीत  तेलंगणा संघाच्या खेळाडूला १२-९ गुणांच्या फरकाने पराभूत केले.  तिसऱ्या व अंतिम फेरीत  दिल्ली संघाच्या खेळाडूस १७-५ च्या फरकाने धूळ चारत सुवर्ण पदकावर आपले नांव कोरले.

दिव्या ही भोसरीतील नियुध्द कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशन आणि कै.पै. मारूती नाना कंद स्पोर्ट्स फाऊंडेशनमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

दिव्याच्या यशाबद्द्ल आमदार महेशदादा लांडगे, महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे सचिन प्रकाश बोईनवाड, महापौर राहुल जाधव, नगरसेवक रवी लांडगे, नगरसेविका यशोदाताई बोईनवाड, भीमाताई फुगे, आकाश कंद, रवींद्र लबडे, नगरसेवक गोपीकृष्ण धावडे, युवा नेते गणेश कंद  आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.