गरूड पुराण म्हणजे काय? मृत्यूनंतर याच वाचन करण्यामागे हा आहे अर्थ…

0
1556

गरूड देव हे भगवान विष्णूंचे वाहन आहेत. गरूडाला फक्त हिंदू धर्मातच नाही तर बौद्धधर्मात सुद्धा महत्त्वाचे पक्षी मानल जात. आपण गरुड पुराणाविषयी ऐकलं असेल पण नक्की गरुडपुराणामध्ये नक्की काय आहे माहितीये??? चला तर जाणून घेऊयात..

जेव्हा भगवान विष्णूंकडे माणसांचा मृत्यू, यमलोकाचा प्रवास, नरक योनी, आणि सद्गतीच्या संदर्भात गरूडाने अनेक विचित्र आणि गूढ प्रश्न विचारले. तेव्हा भगवान विष्णूंनी त्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर दिली आणि याच प्रश्न आणि उत्तराने बनलं गरूड पुराण.गरुडाच्या प्रश्नांची उत्तर देताना भगवान विष्णूंनी व्यक्तीच्या कर्माचे परिणाम आणि त्यांना दंड म्हणून मिळणार्‍या विविध नरकांबद्दल विस्तृतपणे आणि व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी त्याला सद्गतीकडे घेऊन जाऊ शकतात याबद्दल सांगितलय. गरूड पुराणात तब्बल एकोणीस हजार श्लोक सांगितले आहेत. पण सध्याच्या काळात फक्त सात हजार श्लोकच आहेत. त्यामुळे गरुडपुराणात ज्ञान, धर्म, धोरण, रहस्य, व्यावहारिक जीवन, आत्मा, स्वर्ग, नरक आणि बाकी इतर लोकांचे वर्णन केले आहे.

शिवाय आपल्या जीवनाबद्दलच्या बऱ्याच खोलवरच्या आणि गुपित गोष्टी सांगितल्यात ज्यांची माहिती सर्वांना असायलाच हवी. कारण आपल्या आत्मज्ञानाचे विवेचन करणे हाच गरूड पुराणाचा मुख्य उद्देश्य आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, सदाचार, निःस्वार्थ भावनेने केलेले कर्म आणि त्याचा परिणाम या सोबतच यज्ञ, देणगी, तप, तीर्थ सारख्या शुभ कार्यासाठी सर्व सामान्या लोकांना प्रवृत्त करण्यासाठी लौकिक आणि पारलौकिक फळांचे वर्णन केले आहे. या व्यतिरिक्त यामध्ये आयुर्वेद नीतिसार, या विषयांसह मृत जीवांच्या शेवटी केलेल्या कृत्यांचा तपशील वर्णन केलेला आहे.गरूड पुराणात मृत्यूच्या आधी आणि मृत्यूनंतरच्या अवस्थेच वर्णन केल आहे. हिंदुधर्मानुसार जेव्हा एखाद्याचा घरात कोणाचा मृत्यू होतो तेव्हा पूर्ण 13 दिवसापर्यंत गरूड पुराणाच वाचन केलं जातं. कारण त्यामागे असं शास्त्र आहे कि, मृत व्यक्तीचा आत्मा लगेचच दुसरा जन्म घेतं असतो. यासाठी कोणाला 3 दिवस, तर कोणाला 10 ते 13 दिवस लागतात. तर कोणाला सव्वा महिनासुद्धा लागतो. परंतु ज्यांची स्मृती मृत झाली असेल किंवा अकाली मृत्यू झाला असेल तर त्याला पुढचा जन्म घ्यायला कमीत कमी 1 वर्ष लागतं. असं म्हंटल जात कि, मृत व्यक्ती 13 दिवसापर्यंत आपल्या लोकांमध्येच राहतो. त्यामुळे अशावेळी गरूड पुराण पठण केल्याने स्वर्ग, नरक, मोक्ष, सद्गती, अधोगती, दुर्गती, सर्व प्रकारच्या गतींबद्दल ती जाणून घेते. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतरच्या पुढच्या प्रवासात कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्या समोर येणार आहेत किंवा कोणत्या आणि कुठल्या लोकात त्याचे प्रवास कसे होतील या सर्व गोष्टींची माहिती त्याला गरूड पुराण ऐकून कळते.शिवाय जेव्हा एखाद्याच्या मृत्यूनंतर जे लोक शोकसभेला एकत्रित येतात आणि गरूड पुराणाचे पठण होते, तेव्हा त्या बहाण्याने का होईना पण इतर नातेवाइकांना कळतं की चांगले कर्म कोणते आणि वाईट कर्म कोणते? आणि कोणते कार्य केल्यामुळे माणसाला सद्गती प्राप्त होते. यावरूनच मृत व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय या दोघांनाही कळतं की मृत्यूनंतर उच्च लोकात प्रवास करण्यासाठी कोणते चांगले कर्म करायला हवेत. त्यामुळे एकूणच चांगली कर्म करण्यासाठी गरूड पुराण आपल्याला प्रेरित करतं. आपली मदत करत. कारण शेवटी सत्कर्मातूनच सद्गती आणि मोक्ष प्राप्ती होते. आणि म्हणूनच मृत्यूनंतर गरुड पुराणांच वाचन केलं जात…