खुल्या प्रवर्गातल्या तरुणांसाठी राज्य सरकारने सुरु केली ही म्हत्वाची योजना…

0
634

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – खुल्या प्रवर्गातल्या अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक तसेच आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण अकादमी – अमृत ही संस्था स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळान मान्यता दिली आहे.

खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू केले आहे. मात्र, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमृत संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या योजनेअंतर्गत तरुणांना उद्योग व्यवसायासाठी आवश्यक शिक्षण, रोजगार तसेच नोकरीसाठी आवश्यक उच्चशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकासासह कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा आणि एमफील-पीएचडी अभ्यासक्रमांसाठीही या संस्थेतून प्रशिक्षण मिळेल. महिला सक्षमीकरण तसेच समुपदेशनातही ही संस्था काम करणार आहे.