कोल्हापूरातील एचडीएफसी बँकेवर ऑनलाईन दरोडा; ६७ लाख झाले ट्रान्सफर

0
423

कोल्हापूर, दि. २२ (पीसीबी) – दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे एचडीएफसी बँकेच्या खात्यातून ऑनलाईनद्वारे ६७ लाख ८८ हजार रुपये परस्पर ट्रान्सफर झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११.०५ ते दुपारी २.२८ या काळात घडली.

चोरट्यांनी ट्रान्सफर केलेली ही ६७ लाखांची रक्कम वेगवेगळ्या ३४ खात्यांवर हस्तांतर केली असून ‘दी कोल्हापूर अर्बन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव खरोशी यांनी रविवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनोळखीविरोधात अपहार, फसवणूक, माहिती, तंत्रज्ञान अधिनियम २००८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात बँकेवर ऑनलाईन दरोडा आरटीजीएस व एनईएफटी ऑनलाईन व्दारे टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर पोलीस मुंबई सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.