शरद पवारांनीच माझे बोट पकडले आहे – राज ठाकरे  

0
632

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेल्या संबंधावर एका मुलाखतीत खुलासा केला. मी पवारांचे बोट पकडलेले नाही. तर पवारांनीच माझे बोट पकडले आहे, असे आपल्या खास शैलीत राज ठाकरे यांनी सांगितले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याचे म्हटले होते. याचा संदर्भ देत  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना पवारांचे बोट धरून पुढे येणार का? असा प्रश्न केला,  यावर उत्तर देताना  मी नाही, त्यांनीच माझे बोट धरले आहे,  असे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी पुण्यात घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा दाखला दिला.  मुलाखतीवेळीचा फोटो नीट पाहिल्यास, पवार यांनीच माझे बोट धरल्याचे दिसेल, असे  राज ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेत मोदीविरोधात प्रचार सुरु केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट सध्या बारामतीतून येते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.