कोल्हापुरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना पितृशोक

0
1531

कोल्हापूर, दि. ४ (पीसीबी) –  विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील नारायण पांडुरंग नांगरे-पाटील यांचे वयाच्या ७९ वर्षी निधन झाले. पुणे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

नारायण पांडुरंग नांगरे-पाटील हे मूळचे सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील रहिवासी होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. आज (मंगळवार) सायंकाळी पाचच्या सुमारास कोकरूड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.