कोरोनाची पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा उसळी

0
450

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आज ५० ची भर पडल्याने एकूण ६३४ कोरोना बाधित शहरात झाले आहेत. बाधितांमध्ये प्रामुख्याने वाकड, पिंपरी, सांगवी, आनंदनगर, फुलेनगर, इंदिरानगर, दापोडी, मामुर्डी, अजंठानगर, चऱ्होली, भोसरी, ताथवडे, देहुरोड, पिंपळे गुरव, चिंचवड स्टेशन, चिखली, मंचर, खडकी, खेड, आंबेगाव व जुन्नर येथील आहेत. एकूण मृत रुग्णांमध्ये एकूण महापालिका क्षेत्रातील ११ आणि बाहेरील १५ मिळून २६ कोरोना बाधित मृत झाले आहेत.

सध्या शहरात मधील कोरोना रूग्ण २२८ आहेत. एकूण कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ३६६ असूण आज ४७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दाखल संशयित रूग्ण २३१ असूण तपासणीत निगेटिव्ह रूग्णांची संख्या १४२ आहे. २५५ जणांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. आज २९३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले, अशी माहिती पत्रकात दिली आहे.