कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल पळवला

0
215

निगडी, दि. ३० (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर पादचारी व्यक्तीकडील मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 29) मध्ये रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास ट्रांसपोर्ट नगर, निगडी येथे घडली.

प्रियेश नितिन चौबळ (वय 34, रा. चिंचवड) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रियेश हे गुरुवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथून रस्त्याने पायी चालत जात होते. ते रेणुका हॉटेल समोर आले असता चार अनोळखी चोरट्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने प्रियेश यांचा मोबाईल फोन, बूट कंपनीचा इयरपाॅड आणि रोख रक्कम असा एकूण अकरा हजार 700 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.