वूमन डेंटल कौन्सिलच्या राष्ट्रीय सचिव पदी डॉक्टर मनीषा गरुड यांची नियुक्ती; राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

0
249

मुंबई, दि.३० (पीसीबी) : डी.डी.आय आरोग्य सन्मान हा राज्यस्तरीय जूरी आधारित अवॉर्ड समारोह नुकताच राजभवन महाराष्ट्र मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आयुर्वेद मॉडर्न मेडिसिन होमिओपॅथी दंतवैद्यक शास्त्रआणि परिचारिका विभाग 80 नोमिनीस मधून 20 अंतिम निवडले गेले. प्रत्येक विभागातून 4 जूरी नेमण्यात आले. त्यापैकी एकच महिला वूमन डेंटल कौन्सिलचा राष्ट्रीय सचिव डॉक्टर मनीषा गरुड यांची नेमणूक झाली होती. दंत विभागात चंद्रपूरचे डॉक्टर राजीव बोरले यांना जीवन गौरव पुरस्कार आणि ठाण्याचे डॉक्टर अनिश नवरे यांना रफीउद्दीन अहमद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डी.डी. आय चे पदाधिकारी डॉक्टर मनोज देशपांडे, डॉक्टर देवेंद्र हंबर्डेकर, डॉक्टर गिरीश कामत त्यांचे हे आरोग्य सन्माना पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सगळ्या पुरस्कार विजेते जुरी यांचा सन्मान केला. तसेच, आरोग्य सन्मानच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.