कोयता बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

0
714

भोसरी, दि. २ (पीसीबी) – कोयता बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 1) दुपारी मोशी-देहूगाव रोडवर, मोशी येथे करण्यात आली.

आकाश राजाराम भिसे (वय 24, रा. मोशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक गणेश मेदगे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश याने कोयता बाळगला असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 200 रुपये किमतीचा एक कोयता पोलिसांनी जप्त केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत