कोंढव्यात एकाचा गळा आवळून खून

0
390

पुणे, दि. २२ (पीसीबी) – किरकोळ कारणातून झालेल्या वादावादीतून एकाचा खून करण्यात आला. ही घटना कोंढवा परिसरात शुक्रवारी रात्री घडली आहे.

रामदास शामराव शिळीमकर (वय ३८, रा. आंबेगाव ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कात्रज कोंढवा रोडवरील आईएमडी स्कूलसमोरील एका मैदानात आज (शनिवार) सकाळी सहाच्या सुमारास एक मृतदेह आढळून आला.  गळा आवळून या व्यक्तीचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.  अधिक तपास पोलीस करत आहे.