कोंढवा दुर्घटनेतील तिघा आरोपींना जामीन मंजूर

0
433

पुणे, दि. १२ (पीसीबी) – कोंढव्यातील अल्कोन स्टायलश या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ३ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

पंकज व्होरा, सुरेश शहा आणि रश्मिकांत गांधी असे जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांनाही मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला असून पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे.    याआधी अल्कॉन बिल्डरच्या दोघांना अटक झालेली आहे. अल्कोन स्टायलश सोसायटीची इमारत बांधणाऱ्या विकासक विवेक अग्रवाल आणि विपुल अग्रवाल, अशी त्यांची नावे आहेत. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.