अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर योग्य होता, निवड समितीने चुकीचा संघ निवडला !

0
474

मुंबई, दि, १२ (पीसीबी) – भारतीय संघाचे २०१९ विश्वचषक स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आलेले आहे. या पराभवानंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी, भारतीय संघाच्या पराभवाचे कारण निवड समितीवर फोडले आहे. विश्वचषकासाठी निवड समितीने चुकीचा संघ निवडला असा आरोप, जगदाळे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

“भारतीय संघाची मधली फळी, दबावाखाली खेळण्यासाठी योग्य नव्हती हे माझे मत कायम आहे. माझ्या दृष्टीने चौथ्या क्रमांकासाठी अजिंक्य रहाणे योग्य उमेदवार होता. २००३ पासून क्रिकेट खेळत असलेले खेळाडू जे संघात आपली जागा कायम राखू शकले नाहीत, त्यांना तुम्ही संघात स्थान कसे देता? हे खेळाडू संघाचे भविष्य नाहीयेत. रहाणेने पहिल्या इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. अजिंक्यची बाहेरच्या मैदानावरची कामगिरी चांगली होती. विराट आणि चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता फलंदाजीत चांगली फार कमी फलंदाजांनी केली आहे. मग रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूला संघात स्थान का मिळालं नाही. त्याच्याकडे अडचणीच्या काळात संघाला स्थैर्य मिळवून देण्याचे कौशल्य आहे.” जगदाळे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.