कै आनंदाभाऊ युथ फाऊंडेशनतर्फे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा

0
46

पिंपरी: चिंचवड वाल्हेकरवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर समिती, सांस्कृतिक मित्र मंडळ व कै आनंदाभाऊ युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा सप्ताह साजरा करण्यात आला. भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा रंगला.

चिंचवड रजनीगंधा सोसायटीतील श्री स्वामी समर्थ मंदिर समितीने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मागील बुधवारी पवमान पूजा, अभिषेक पोथी पारायण तसेच श्रीराम महिला भजनी मंडळाचे भजन आणि चंद्रशेखर काळकर यांचे प्रवचन झाले. गुरुवारी पोथीचे पारायण तसेच भुलेश्वर महिला मंडळाचे भजन, शुक्रवारी पोथीचे पारायण, श्रीराम महिला भजनी मंडळाचे भजन तसेच महेश शेटे आणि सह कलावंतांनी भक्ती गीते सादर केली.

शनिवारी केरोबा महिला मंडळाचे भजन आणि हरीश दळवी यांचा भक्तिगीते कार्यक्रम झाला. रविवारी रामरक्षा पठण, नारायणी महिला भजनी मंडळाचे भजन, तसेच ब्रम्हनाथ भक्ती रंग कार्यक्रम सादर झाला. सोमवारी मयुरेश महेश पोळ यांचे प्रवचन झाले. दुर्गेश्वर महिला मंडळाचे भजन झाले. त्यानंतर अंकुर महाराज साखरे यांचे कीर्तन झाले. मंगळवारी वैशाली महाराज खोले यांनी तसेच हभप उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन झाले.

कीर्तन आणि महाप्रसाद
प्रकटदिनी लघु रुद्र व होमहवन, प्रशांत महाराज बरीदे यांचे नारदीय कीर्तन त्यानंतर प्रकट दिन सोहळा झाला. स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाचे भजन आणि दिगंबर राणे यांचा भजन संध्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, अंकुश चिंचवडे, सागर चिंचवडे, संजय रौंदळ, संजय कुलकर्णी, यशराज चिंचवडे, गोरोबा कोल्हे, दिलीप कोकरे, सुजाता चिंचवडे, वैजनाथ माली, प्रकाश चव्हाण, शंकर मुळीक, शंकर सावंत, दीपक पाटील आदी उपस्थित होते. यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आले. श्री स्वामी समर्थ मंदिर समितीच्या वतीने भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा रंगला