कुरुळीमध्ये तरुणीचा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या चोरट्यास काही तासातच अटक

0
503

चाकण, दि. ८ (पीसीबी) – पायी निघालेल्या एका तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला चाकण पोलिसांनी काही तासातच अटक केली. ही घटना मंगळवार (दि.७) दुपारी सव्वातीनच्या सुमारास कुरुळी येथील स्पायसर कंपनीजवळ घडली.  

याप्रकरणी चांदणी चंद्रकांत बनसोडे (वय २२, रा. रास्ते, खेड) या तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, वैभव संजय काकडे (वय २५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दुपारी सव्वातीनच्या सुमारास फिर्यादी चांदणी ही कुरुळी येथील स्पायसर कंपनीजवळून पायी चालली होती. यावेळी दुचाकी (क्र.एमएच/१२/केयु/६१४८) वरुन आलेल्या वैभव याने चांदणीच्या हातातील तिचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसका मारुन चोरुन नेला. चांदणीने तातडीने चाकण पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी जलद गतीने तपास चक्रे फिरवत काही तासातच आरोपी वैभव याला अटक करुन मोबाईल हस्तगत केला.