कुणी एक व्यक्ती पक्षाचं धोरण स्वीकारु शकत नाही – शरद पवार

0
328

सातारा,दि.२५(पीसीबी) – वेगळं मत असेल तर ते पक्षाच्या बैठकीत मांडायला हवं, कुणी एक व्यक्ती पक्षाचं धोरण स्वीकारु शकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते कराडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी, “बहुमत नसतानाही भाजपानं सरकार बनवलं, केंद्रातील सत्ता, राज्यपाल याचा गैरवापर करण्यात आला,” असल्याचा आरोप केला. पक्ष म्हणून राष्ट्रावादी सरकारमध्ये सामील नाही. हा पक्षाचा निर्णय नाही, त्याच्याशी आम्ही सहमत नाही असं यावेळी शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. “ही निवड वैध आहे की नाही हा खरा प्रश्न असून राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान झाल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील,” असंही यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी पक्षाचा सरकारला पाठिंबा नाही. बहुमत नसताना भाजपने सरकार बनवलंय. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी सगळं स्पष्ट होईल. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार येईल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.