भाजपला पाठिंबा देण्यामागे तुमचा हात? त्यावर शरद पवार म्हणतात…..

0
553

सातारा,दि. २५(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले आणि आरोपही झाले. भाजपला पाठिंबा देण्यामागे स्वतः शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोपही यापैकीच एक . याविषयी पत्रकारांनी विचारले असता शरद पवार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले, माझ्या पक्षातील सहकाऱ्यांना मी काही मुद्दे पटवून दिले तर ते माझं म्हणणं नाकारतात असा माझा अनुभव नाही. मला जर भाजपला पाठिंबा द्यायचा असता तर मी त्यांना सांगून पाठिंबा देऊ शकलो असतो. त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्यात माझा हात आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही.