कासारवाडी येथे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगाराला २ पिस्तूल आणि ३ जीवंत काडतुसांसह अटक

0
446

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – सांगवी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पाठलाग करुन अटक केली. ही कारवाई कासारवाडी येथील दर्गाशेजारी असलेल्या भंगाराच्या दुकानासमोरील रस्त्यावर करण्यात आली.