काश्मीर खोऱ्यात २५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

0
514

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या एक दिवस आधी पाकिस्तानने घातपात करण्याचा कट रचला आहे. काश्मीर खोऱ्यात सुमारे ३०० दहशतवादी सक्रीय झाले असून सुमारे २५० दहशतवादी लॉन्चपॅडवर सीमेपलीकडून घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. 

काश्मीरमध्ये  दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात हे अतिरेकी असल्याची लष्कराची माहिती आहे. त्यामुळे भारतीय लष्कराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर लष्कर, पोलीस, सीआरपीएफसह सर्व दलांनी कडेकोट बंदोबस्त  तैनात केला  आहे.

निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. सोमवारी चार टप्प्यांतील मतदान होणार आहे. सुरक्षेचे उपाय म्हणून गाड्यांच्या तपासणीसह संशयित व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. तपासणी नाक्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.