निगडीत गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

0
696

निगडी, दि. ७ (पीसीबी) – अप्पूघर कॉर्नरजवळून ट्रान्सपोर्ट नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघा तरुणांना गावठी कट्टा आणि एक दुचाकी असा ४५ हजार रुपयांच्या ऐवजासह निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

दीपक रामबाबू मिश्रा (वय २७, रा. पवारवस्ती, ताथवडे. मूळ रा. चौखटा, ता. मजा, जि. इलाहाबाद, उत्तरप्रदेश) आणि इर्शाद बकरीदी शेख (वय २३, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे. मूळ रा. श्रवणपूर, निदौरा, ता. खागा, जि. फत्तेपूर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते त्यावेळी एका खबऱ्याने त्यांना अप्पूघर कॉर्नरजवळ ट्रान्सपोर्टनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघेजण एका दुचाकीवरून जात आहेत त्यांच्याजवळ गावठी कट्टा आहे, अशी माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी इर्शाद आणि दीपक या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आला. दोघांनाही अटक करण्यात आली असून गावठी कट्टा आणि दुचाकी असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, रवींद्र जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल एन सोनवणे, पोलीस कर्मचारी नारायण जाधव, किरण खेडकर, मंगेश गायकवाड, आनंद चव्हाण, स्वामीनाथ जाधव, सुनील शिंदे, फारूक मुल्ला, रमेश मावसकर, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, सागर शेंडगे, शरीफ मुलाणी, नाणेकर यांच्या पथकाने केली.