कामशेत मध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीस उस्फुर्त प्रतिसाद…

0
140

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटलांच्या समर्थकांध्ये वाढ

मावळ लोकसभेचे शिलेदार संजोग वाघेरे पाटीलच !

कामशेत, दि. १७ (पीसीबी) – मावळ लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. तरी चर्चा रंगतेय ती फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटलांचीच. विकासाचे मुद्दे घेऊनच प्रचार करणारे संजोग वाघेरे पाटील यांची लोकप्रियता वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. महाविकास आघाडीची मावळ लोकसभेची आढावा बैठक शनिवारी (दि.16) कामशेत बाजारपेठेतील गणेश मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीला घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. मावळ लोकसभा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे कामशेतमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करण्यात आले. दिवसेंदिवस संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येत वाढ होत चालल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

महाविकास आघाडीच्या या समन्वय बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट ) पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, मावळ तालुका कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पैलवान चंद्रकांत सातकर, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे (शरद पवार गट ) मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, मावळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, लोणावळा शहर अध्यक्ष बाळासाहेब फाटक, राष्टवादीचे नेते पायगुडे सर, संघटक मदन शेडगे, उपतालुका प्रमुख सोमनाथ कोंडे, डॉ विकेश मुथा, युवासेना अधिकारी उमेश गावडे, प्रमोदसिंग गोतारले, विशाल वहिले, अतुल राऊत, नासिर शेख, विकी फोगट, माऊली काळोखे, यशवंत पायगुडे, खंडू तिकोने, हाजीमल्ल मरीमतुर, राजू काकडे, निखिल विश्वंभर, रोहिदास वाळुंज, राजेश वाघोले, उमेश गावडे, शांताबाई खंडागळे, मारुती खोपे यांच्यासह मोठ्या संखेने प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, कामशेत मध्ये मतदारांकडून आणि कार्यकर्त्यानकडून विशेषतः महिलावर्ग आणि तरुणांकडून त्यांचे जे मनापासून स्वागत झाले, ते पाहतासंजोग वाघेरे पाटील हेच मावळ लोकसभेचे शिलेदार होणार असल्याचे संकेत मिळाले. मावळ लोकसभा मतदार संघाचा विकास केवळ संजोग वाघेरे पाटील यांच्यासारखा तळमळीने काम करणारा नेताच करू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे, गेल्या दहा वर्षांत मागील खासदारांवर कार्यकर्त्यांची नाराजी दिसून आल्यामुळे आम्ही संजोग वाघेरे पाटील यांच्यासोबत असणार, असा निर्धार येथील कार्यकर्त्यांनी केला.

चिखलसे गावातील तरुणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
अनिल काजळे, संपत काजळे, नितीन चांदगुडे, आदेश चौधरी, अभिषेक काजळे, रोशन काजळे, अतुल काजळे, प्रसाद काजळे, सिताराम बरदाडे, दत्ता काजळे, गजानन काजळे, मिथुन काजळे, भगवान काजळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.