काँग्रेसला मोठा धक्का; कर्नाटकात सर्वच मंत्र्यांनी दिले राजीनामे

0
452

बेंगळुरू, दि. ८ (पीसीबी) – आधी १३ आमदारांनी, नंतर सरकारमधील एका अपक्ष मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आता कुमारस्वामी सरकारमधील सर्वच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात सापडले आहेच.

काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अपक्ष आमदार नागेश यांनीही आज आमदारकीचा राजीनामा दिला. नागेश हे कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. या १४ आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास २२४ सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेची संख्या २१० होईल. त्यामुळे बहुमतासाठी ११३ ऐवजी १०६ सदस्य संख्या लागेल. १४ आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यावर कुमारस्वामी सरकारच्या आमदारांची संख्या केवळ १०४ होईल. त्यामुळे कुमारस्वामी सरकारला बहुमतासाठी दोन जागांची अवश्यकता निर्माण होईल.