कसा जन्माला Brand ‘adidas’; ‘PUMA आणि adidas’ मधला ‘हा’ जवळचा संबंध माहितीये…

0
575

या पूर्वीच्या काळात लोक ब्रँड वगैरे काही मानत नव्हते कारण ब्रँड काय असतो हे त्यांना मुळात माहीतच नव्हतं. कारण आधीच्या लोकांचं एकच ब्रीदवाक्य होत ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’. मात्र आजचा हा जमाना ब्रॅण्डचा आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या लोकांच्या तोंडून ‘ आमच्या वेळी नव्हतं बाबा असं काही” असे डायलॉग सहज ऐकायला मिळतात. आता आपण खूप सारे ब्रँड ओळखतो. जसे कि पुमा, रेमंड, आदिदास. या जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा खूपच प्रेरणादायी आहेत. रंजक, अविश्वसनीय परंतु खऱ्या. आता आपण ‘आदिदास’ या नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊयात.

असं म्हणतात कि, काही खुणा, रेषा अस्तित्वात येतानाच सोबतच आपलं नशीब घेऊन येतात. ज्यांना काही अर्थ नसतो, काही संबंध नसतो तरीसुद्धा या खुणा जगावर राज्य करतात. कारण त्या खुणांनी विश्वास, मेहनत आणि प्रभाव कमावलेला असतो. या तीन रेषा बुटांवर येतात तेव्हा बुटांसोबत उचललेलं प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाची, खात्रीची असतात. युरोपातील नंबर वन आणि जगभरातील दुसरा सर्वात मोठा शू ब्रँड म्हणजे ‘अदिदास’. मग साधा सुद्धा आदिदास ब्रँड कसा झाला?? माहितीये…

‘अदिदास’ या ब्रँड नावामागेही एक मोठा इतिहास आहे, मेहनत आहे, कष्ट, जिद्द आहे….

जर्मनीतल्या एका गावात (Herzogenaurach) ख्रिस्टोफ वोन विल्यम डॅसलर हा व्यक्ती एका शू कंपनीत काम करत असायचा तर त्याची बायको घरच्याघरी लॉण्ड्री चालवायची. यांना दोन मुलं म्हणजेच रुडॉल्फ म्हणजेच रुडी डॅसलर आणि अडॉल्फ म्हणजे एडी डॅसलर. यातल्या अडॉल्फने आईच्या छोटय़ाशा लॉण्ड्रीत स्वत:च स्पोर्ट्स शूज बनवायला सुरुवात केली. १९२४ च्या जुलैमध्ये रुडॉल्फने आपला फॅक्टरीतला जॉब सोडला आणि आपल्या भावाच्या छोटय़ाशा व्यवसायात त्याने स्वतःला सामील करून घेतलं. महायुद्धाच्या काळात वीजपुरवठा सारखा खंडित होत असायचा, त्यामुळे या छोटय़ाशा घरगुती फॅक्टरीत शूज तयार करण्यासाठी दोन्ही भाऊनी काही वेळा स्टेशनरी बायसिकलवर पॅडल मारून त्यातून निर्माण होणाऱ्या विजेवर आपली उपकरणं चालवली. आणि आपल्या डॅसलर ब्रदर्स शू फॅक्टरीची ही सुरुवात होती.

१९३६ मध्ये अदी डॅसलरला यांना एक संधी आवाज देऊ लागली. १९३६ मध्ये समर ऑलिम्पिक्स आपल्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल हे त्याला समजलं. ऑलिम्पिकनगरीत स्पाइक्सने भरलेली बॅग घेऊन अदी डॅसलर पोहचला. अमेरिकेचा धावपटू जेस्सी ओवेन्स याला त्याने आपले स्पोर्ट्स शूज स्पॉन्सर केले. आणि त्यावर्षी जेस्सीने चार सुवर्णपदकं आपल्या नावावर केली. आणि जेस्सीच्या पदकांनी डॅसलर शू फॅक्टरीचं नाव सगळीकडे वाऱ्यासारखं पसरलं. दुसऱ्या महायुद्धाआधीपर्यंतच्या काळात डॅसलर शू फॅक्टरी वर्षांला दोन लाख शूज विकण्यापर्यंत भक्कम परिस्थितीला पोहचली.

मात्र यश म्हंटल कि अडथळ्यांची शर्यत हि आलीच कि. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काही गैरसमजांमुळे डॅसलर बंधूत वाद निर्माण झाले. १९४७ च्या वेळी हि दोन्ही भावंडे अधिकृतपणे वेगळी झाली. रुडॉल्फने A RUDA (रुडा) नावाची स्वत:ची स्वतंत्र ‘शू कंपनी’ स्थापन केली. A RUDA (रुडा) हे नाव रुडॉल्फ डॅसलर नावातील सुरुवातीची दोन अक्षरं घेऊन हे नाव जन्माला आलं. कालांतराने हाच ‘रुडा’ ब्रॅण्ड नव्या नावासह समोर आला आणि जगप्रसिद्ध झाला. जो आत्ता ‘PUMA’ नावाने लौकिक मिळवतोय. अदीनेपण हाच फंडा नावासाठी वापरला Adolf Dassler मधली सुरुवातीची अक्षरं वापरून तयार झाला नवा ब्रॅण्ड ‘Adidas’. याचा उच्चार आहे ‘एडिडास’. ‘एडिडास’ का ‘अदिदास’ असे वेगवेगळे उच्चार वेगवेगळ्या प्रकारे होत असताना मात्र नेमक्या उच्चाराबाबत गोंधळ होतो. भारतीय मंडळी मात्र ‘अदिदास’ हाच उच्चार करतात. हा उच्चार चूक नाही पण हा भारतीय उच्चार आहे. मात्र हे जर्मन कनेक्शन आहे.

एकदा एखाद्या ब्रॅण्डचं नाव झालं की मग काय हवे ते संदर्भ त्याला जोडता येतात. अदिदास मधल्या अडॉल्फने डॅसलरला बाजूला ठेवून ‘All Day I Dream About Sports’ असाही या आद्याक्षरांचा अर्थ काढला गेला, पण ती केवळ गंमत ठरावी. आपल्या लोगोसाठी फार विचार न करता अडॉल्फने त्याच्या शूजवरील तीन स्ट्रिप्सचं- रेषांचं डिझाइनच लोगो म्हणून पुढे आणलं जे आजही साऱ्या जगात लौकिक मिळवत आहे. ‘Three Strips Company’ अशी अडॉल्फच्या या व्यवसायाची सुरुवातीची ओळख होती. मधल्या काळात या तीन रेषांना त्रिदलातून साकारलं गेलं. कारण कंपनीच्या भरभराटीचा, विस्ताराचा विचार दर्शवायचा होता. क्लासिक प्रॉडक्ट्ससाठी आताही हा लोगो वापरला जातो. नव्या लोगोतही तीन रेषा आणि अदिदास नाव आजही आहे. यावरूनच काहींना या चढत्या श्रेणीच्या रेषा पर्वताची आठवण करून देणाऱ्या वाटतात.

एका छोटय़ा लॉण्ड्रीरूममधून सुरू झालेला हा प्रवास ऑलिम्पिक, भावांमधील व्यावसायिक नात्यातील पूर्णविरामा सह, पुन्हा वेगवेगळ्या रेषांवर सुरू होण्याची, विस्तारण्याची ही गोष्ट. म्हणूनच तीन रेषांची ही कहाणी. दोन भावांचा हा ब्रँड त्यांच्या नावातूनच ‘आदिदास’ म्हणून नावारूपाला आला..

अगदी तरुणपणीच आईच्या छोटय़ाशा लॉण्ड्रीत जर्मन बंधूं असलेल्या या रुडॉल्फ आणि अडॉल्फ यांनी स्पोर्ट्स शूज बनवायला आरंभ केला. डॅसलर ब्रदर्स शू फॅक्टरीची ही सुरुवात होती. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान काही गैरसमजांमुळे डॅसलर बंधूत वितुष्ट आलं. रुडॉल्फने स्वत:ची शू कंपनी सुरू केली. त्या कंपनीचं नाव होतं RUDA (रुडा) रुडॉल्फ डॅसलर या नावातील सुरुवातीची दोन अक्षरं घेऊन हे नाव गुंफलं गेलं. कालांतराने हाच ‘रुडा’ ब्रॅण्ड नव्या नावासह समोर आला. तो आहे आताचा PUMA हा शू ब्रँड. अ‍ॅडीने हाच फंडा नावासाठी वापरला Adolf Dassler मधली सुरुवातीची अक्षरं वापरून तयार झाला नवा ब्रॅण्ड Adidas.