कंपनीमधून सात लाखांची कॉपर वायर चोरीला

0
280
3315684 - macro detail of a powercable.

चाकण, दि.२३(पीसीबी) – वासुली येथील एका कंपनीमधून अज्ञात चार चोरट्यांनी कॉपर वायरचे सहा लाख 93 हजार रुपयांचे 18 केबल रोल चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 22) पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास घडली.

नितीन आनंदा सावंत (वय 31, रा. पाईट रोड, शिरोली, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे तीन ते चार वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वासुली येथील ओ प्रो लिमिटेड या कंपनीच्या भिंतीवरील तारा कापून खिडकीतून आत प्रवेश केला. कंपनीतून चोरट्यांनी सहा लाख 93 हजार रुपये किमतीचे 18 बंडल कॉपर केबल चोरून नेली. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.