“… परंतु विरोधक राजकीय स्वार्थासाठी कोल्हेकुई करून दिशाभूल करतायेत”

0
203

मुंबई,दि.२३(पीसीबी) – मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात कसे टिकेल, यासाठी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री एकदिलाने प्रयत्न करीत आहेत. परंतु, विरोधक आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोल्हेकुई करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि विनायक मेटे यांना लगावला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सर्व मंत्र्यांची इच्छा आहे. त्यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. आधीच्या सरकारने दिलेले वकील आरक्षणाच्या लढाईसाठी नियुक्त केले आहेत. त्यांच्या मदतीला नवीन वकील देऊन मराठा आरक्षणाची लढाई सुरू केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सर्वांची मागणी आहे. मात्र, विरोधक याबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाला मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचाच विरोध असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, आमदार विनायक मेटेसह भाजपच्या नेत्यांनी केले होते.