उसने दिलेले पैसे मागितले म्हणून एकाला मारहाण

0
275

निगडी,दि.२३(पीसीबी) – महिलेला उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून पैसे मागणा-या व्यक्तीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री आठ वाजता कोयतेवस्ती चौक, पुनावळे येथे घडली.

जुबेर मौला आत्तार (वय 33, रा. निगडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय चव्हाण व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जुबेर यांनी किरण पंजाबी या महिलेला 8 सप्टेंबर रोजी पाच हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे मागण्यासाठी फिर्यादी कोयतेवस्ती येथे गेले. महिलेकडे पैसे मागितले असता महिलेने ‘मी तुझे पैसे केंव्हा घेतले आहेत.’ हे उत्तर ऐकून जुबेर कोयतेवस्ती चौकात आले.

जुबेर यांचा फोनवरून माग काढून आरोपी कोयतेवस्ती चौकात आले. त्यांनी फिर्यादी यांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारून जुबेर यांना गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.