कंपनीमधील माल घेऊन जाणाऱ्या ट्रकची तोडफोड करण्याची धमकी

0
186

दिघी, दि.२ (पीसीबी) – कंपनीमधून माल खरेदी करून ट्रकमधून घेऊन जात असताना दोघांनी मिळून ट्रक अडवले. तसेच ट्रकची तोडफोड करण्याची धमकी दिली. ही घंटा रविवारी (दि. 28) रात्री आठ वाजता दिघी येथील प्रोथॉम इंडस्ट्रीज इंडिया प्रा ली या कंपनीत घडली.

कृष्णा अशोक तापकीर (वय 35), नितीन सुदाम तापकीर (वय 32, दोघे रा. वडमुखवाडी, च-होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत देवांग प्रमेश संपत (वय 44, रा. वाशी, नवी मुंबई) यांनी सोमवारी (दि. 1) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संपत यांनी दिघी मधील प्रोथॉम इंडस्ट्रीज इंडिया प्रा ली या कंपनीतून माल खरेदी केला होता. खरेदी केलेला माल ट्रकमधून घेऊन जात असताना आरोपींनी ट्रक अडवले. ट्रकची तोडफोड करण्याची धमकी देत फिर्यादी यांच्या कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.