गुप्तांगावर मारून निर्घृणपणे तरुणाचा खून; नग्नावस्थेत मृतदेह ड्रेनेजमध्ये फेकला

0
288

देहूगाव, दि. २ (पीसीबी) – गुप्तांगावर गंभीर दुखापत केली. तसेच ओळख पटू नये यासाठी चेहरा ठेचला. त्यानंतर मृतदेह नग्नावस्थेत इंद्रायणी नदीलगत ड्रेनेज आऊटलेटमध्ये फेकला. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी देहूगावात शिवनगरी येथे इंद्रायणी नदीलगत एका ड्रेनेज लाईनच्या आऊटलेट जवळ उघडकीस आली.

खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे यांनी सोमवारी (दि. 1) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगावात शिवनगरी येथे इंद्रायणी नदीलगत ड्रेनेज आऊटलेट नंबर चार जवळ एक नग्नावस्थेत मृतदेह पडल्याची माहिती देहूरोड पोलिसांना रविवारी सकाळी अकरा वाजता मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

मयत व्यक्तीचे वय अंदाजे 30 वर्ष आहे. त्याच्या गुप्तांगावर गंभीर दुखापत करण्यात आली आहे. तसेच ओळख पटू नये यासाठी त्याचा चेहरा देखील विद्रुप करण्यात आला आहे. शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या अवस्थेत अज्ञातांनी मृतदेह खून करून फेकून दिला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.